Home Cities जळगाव बांधकाम ठिकाणाच्या इमारतीतून इलेक्ट्रिकल वायर लंपास

बांधकाम ठिकाणाच्या इमारतीतून इलेक्ट्रिकल वायर लंपास

0
23

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद रोडवर असलेल्या होमगार्ड ट्रेनिंग सेंटरच्या इमारतीतून इलेक्ट्रिक वायर चोरट्यांनी लंपास केली. याबाबत नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर माहिती अशी की, “नशिराबाद रोडवर होमगार्डचे ट्रेनिंग सेंटरची इमारत आहे. या ठिकाणाहून १३ मार्च ते २३ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजेदरम्यान तीस मीटर इलेक्ट्रिकल लंपास केली. घटना समोर आल्यानंतर याबाबत ट्रेनिंग सेंटरमधील कर्मचारी गंगाधर दहशत महाजन वय ५१ यांनी शुक्रवारी नशिराबाद पोलिसात तक्रार दिली.

त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन साहेबराव देशमुख हे करीत आहेत.


Protected Content

Play sound