जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसीतील एका प्लास्टीक कंपनीतून दीड हजाराच्या रोकडसह टि.व्ही. व इलेक्ट्रॉनिक वस्तू असा एकुण ३० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, एमआयडीसी हद्दीतील व्ही सेक्टरमधील महेश प्लास्टिक इंडस्ट्रिज नावाच्या कंपनीत १३ मे रोजी सायंकाळी ५ ते १५ मे सकाळी ९.३० वाजेच्या दरम्यान कंपनी बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या कार्यालयाचे दरवाजाचे कुलूप तोडून कार्यालयातील टिव्ही, सीसीटीव्ही कॅमेरा डिव्हीआर, लुम मोटार, गेअर मोटार यासह ३ हजार रूपयांचे रोकड असा एकुण ३० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी कंपनीचे मॅनेजर तुषार राणे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करीत आहे.