फैजपूर प्रतिनिधी । यावल तालुक्यातील दुसखेडा येथील शेतकऱ्याची शेतातून विद्यूत पंप चोरीप्रकरणी फैजपूर पोलीसांनी पाच जणांना अटक करून त्यांच्या ताब्यातील एक लाख रूपये किंमतीच्या दोन विद्यूत पंप आणि दोन मोटारसायकली जप्त करण्यात आले.
याबाबत माहिती अशी की, नितीन दयाराम सोनवणे (वय- 34) रा. दुसखेडा ता. यावल हे शेतकरी असून शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. 19 सप्टेंबर रोजी त्यांच्या शेतातील विहिरीवरील विद्यूत पंप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. याप्रकरणी नितीन सोनवणे यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी गुप्त माहितीवरून सैय्यद तालीम सैय्यद नुर (वय-20) , लोकेश दिलीप कोळी (वय-18), योगेश दौलत राजपूत (वय-19), किरण रमेश कोळी (वय-20)आणि हेमंत अर्जुन कोळी (तायडे) यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातील दोन विद्यूत पंप आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेले दोन मोटारसायकली जप्त करण्यात आले आहे. याकामी फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या र्मादर्शनाखाली सपोनि प्रकश वानखडे, स.फौ हेमंत सांगळे तपास करीत आहे. पोहकॉ गोकुळे तायडे, पो.ना. अनिल महाजन, पोना किरण चाटे, पोकॉ महेंद्र महाजन आणि पोकॉ ज्ञानेश्वर पवार यांनी याकामी मदत केली.