Home Uncategorized जळगावात इलेक्ट्रिक डीपीला आग

जळगावात इलेक्ट्रिक डीपीला आग


123
 

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील शनिपेठ परिसरातील घरकुल चौकात आज सकाळी अचानक एका इलेक्ट्रिक डीपीला आग लागल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले होते.

 

आज सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास घरकुल चौकातील इलेक्ट्रिक डीपीला अचानक आग लागली. थोड्याच वेळात आगीने रौद्ररुप धारण केले. या परिसरात नागरिकांसाठी ही एकच इलेक्ट्रिक डीपी आहे. त्यावरील अतिभारामुळे महिनाभरातली ही आगीची तिसरी घटना आहे. या प्रकाराबाबत महावितरण कंपनीविरुद्ध येथील महिला व नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली आहेत. मात्र, तरीही महावितरणकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे हा प्रकार घडत असल्याचे नागरिकांच्या म्हणणे आहे. दरम्यान, महावितरण मोठ्या दुर्घटनेची वाट बघतेय? असा संतप्त सवालही नागरिक उपस्थित करताय.


Protected Content

Play sound