पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा शहर व तालुक्यातील नाभिक समाजाच्या सर्वांगिण विकासाचा ध्यास घेवुन नोंदणीकृत सकल नाभिक समाज बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षपदी नरेश गर्गे तर उपाध्यक्षपदी योगेश चित्ते यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
पाचोरा शहर व तालुक्यातील नाभिक व्यावसायिक तरूणांना स्पर्धेच्या युगात आधुनिक तंञज्ञानाचे तंञ शिकुन स्वतःसह समाजाची उन्नती करण्यासाठी तसेच समाजातील रूढी, परंपरा आणि संस्कृती सोबतच समाज संघटनासाठी येथील नाभिक समाज बांधवांनी एकञ येवुन दि. ६ आक्टोंबर रोजी सकल नाभिक समाज बहुउद्देशिय संस्थेची स्थापना केली असुन या संस्थेच्या अध्यक्षपदी नरेश रमेश गर्गे, उपाध्यक्षपदी योगेश पंढरीनाथ चित्ते, सचिवपदी रमेश वारुळे, सहसचिव फकिरा शिरसाठ तर खजिनदारपदी बारकु चित्ते यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

या संस्थेच्या सदस्यपदी चिंतामण जाधव, सुधिर चित्ते, गजानन जाधव, जगदिश सोनवणे, नितीन अहिरे व चेतन चित्ते तर सल्लागारपदी साहेबराव सैंदाणे, पितांबर नेरपगार, अशोक चित्ते व राजेंद्र सोनवणे यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या सर्व पदाधिकार्यांचे सर्वञ अभिनंदन होत आहे.



