मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. दरम्यान, यावेळी महाराष्ट्रातील तसेच हरिणायातील विधानसभेच्या निवडणुका जाहीर करण्यात येणार आहेत.
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी याआधीच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला होता. त्या बैठकीनंतर त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका दिवाळीच्या अगोदरच घेण्याबाबत सकारात्मक असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता फक्त औपचारिक घोषणा बाकी असल्याचंही बोललं जात आहे. 2014 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांवेळी 12 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली होती. तसंच 15 ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर 19 ऑक्टोबर रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले होती.