Home Cities भुसावळ मांडवे दिगर येथे शिवसेना शाखेतर्फे शेतकरी दिन साजरा

मांडवे दिगर येथे शिवसेना शाखेतर्फे शेतकरी दिन साजरा

960853a3 70fb 4476 b4ab c60ae7386e10
960853a3 70fb 4476 b4ab c60ae7386e10

960853a3 70fb 4476 b4ab c60ae7386e10

भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील मांडवे दिगर येथे शिवसेना शाखेतर्फे आज (दि.२) शेतकरी दिन व माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रतिमापूजन करण्यात येऊन वसंतराव नाईक यांच्याबद्दल गौरवोद्गार काढण्यात आले.

 

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील व तालुकाप्रमुख समाधान महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद शाळा व भिलवडी येथील विद्यार्थ्यांना भुसावळ विधानसभा संघटक निलेश सुरडकर यांच्यामार्फत शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे पदाधिकारी विलास मुळे, जिल्हा संघटक नीलेश महाजन, प्रवीण पाटील, उपजिल्हा युवा अधिकारी प्रवीण पाटील, माजी शहरप्रमुख नामदेव बराटे, प्रसिद्धीप्रमुख तुषार बराटे, विभागप्रमुख पंकज पाटील, शाखाप्रमुख मांडवे दिगर कैलास पवार यांचेसह मांडवे दिगर ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.


Protected Content

Play sound