Home Cities अमळनेर ‘शनी’ उतरवण्याच्या बहाण्याने बसस्थानकातून वृध्दाची ५० हजारांची सोन्याची अंगठी लंपास

‘शनी’ उतरवण्याच्या बहाण्याने बसस्थानकातून वृध्दाची ५० हजारांची सोन्याची अंगठी लंपास


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर बसस्थानक परिसरात एका वृध्द प्रवाशाला बोलण्यात गुंतवून, ‘शनी’ असल्याचे सांगून हातचलाखीने त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी चोरून नेल्याची धक्कादायक घटना शनिवारी १८ ऑक्टोबर सकाळी १० वाजता घडली आहे. या फसवणुकीत वृध्दाचे सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास झाले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील रहिवासी बळवंतराव जयवंतराव वाघ (वय-वृध्द) हे त्यांच्या मुलीच्या घरी जाण्यासाठी अमळनेर बसस्थानकात थांबले होते. याच वेळी अनोळखी तीन व्यक्ती त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी बळवंतराव वाघ यांच्याकडे शेगावला जाणाऱ्या बसबद्दल विचारणा केली.

वाघ यांनी आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले. त्यानंतर या तिघांनी त्यांना बोलण्यात गुंतवून “तुम्हाला ‘शनी’ आहे,” असे सांगितले आणि काहीतरी हातचलाखी केली. या चलाखीमध्ये त्यांनी बळवंतराव वाघ यांच्या हातातील अंदाजे ५ ग्रॅम वजनाची, ५० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी काढून नेली.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बळवंतराव वाघ यांनी त्वरित अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घटनेची तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून अमळनेर पोलिसांनी अज्ञात तीन जणांविरोधात रात्री १० वाजता फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक संतोष नागरे हे करीत आहेत. बसस्थानक परिसरातील प्रवाशांनी अनोळखी व्यक्तींशी बोलताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


Protected Content

Play sound