शिवीगाळ करत असल्याच्या संशयावरून वृद्ध महिलेला काठीने मारहाण: दोघांवर गुन्हा दाखल

अमळनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अमळनेर शहरातील ताडेपुरा भागात शिवीगाळ करत असल्याचा संशयावरून ७० वर्षीय एका वृद्ध महिलेला जमिनीवर पाडून काठीने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना शुक्रवारी २८ जून रोजी दुपारी १२ वाजता घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अमळनेर शहरातील ताडेपुरा भागात विमलबाई आसाराम धनगर (वय-७०) या वृद्ध महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शिवीगाळ करत असल्याच्या संशयावरून रामचंद्र चावदास ठाकरे आणि पियुष रामचंद्र ठाकरे या दोघांनी वृद्ध महिलेला जमिनीवर पाडून काठीने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना शुक्रवारी २८ जून रोजी दुपारी १२ वाजता घडली. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता मारहाण करणारे रामचंद्र चावदास ठाकरे आणि पियुष रामचंद्र ठाकरे या दोघांवर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहे.

Protected Content