जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावातील साथी बाजार परिसरात भरधाव कारने दिलेल्या धडकेत रस्त्याने पायी जात असलेल्या वृध्द गंभीर जखमी झाल्याची घटना रविावरी १७ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी सोमवारी १८ मार्च रोजी रात्री ८ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील साथी बाजार परिसरातील बन्नत बुवा मंदिराजवळ सखूबाई उमेश माळी हा वास्तव्यास आहे. त्यांचे पती रमेश माळी हे रविवारी १७ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास रस्त्याने पायी जात होते. यावेळी (एमएच १९, बीजे ५२८९) क्रमांकाची कार रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगाने जात होती. या कारने पायी जाणाऱ्या वृध्दाला जोरदार धडक दिली. यामध्ये ते रस्त्यावर पडल्याने उजवा डोळ्याला दुखापत झाली तर पाय फ्रॅक्चर होवून गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन सोमवारी १८ फेब्रुवारी रेाजी कार चालक जयेश दिलीप रोटो रा. नशिराबाद ता. जळगाव याच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र ठाकरे हे करीत आहे.