ड्यूटी लावण्यावरून बसचालकाला मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील नवीन बसस्थानकात असलेल्या पेट्रोल पंपाच्या समोर ड्युटी लावण्याच्या कारणावरून बसचालकाला एकाने दगडाने मारून डोक्याला व हाताला गंभीर दुखापत केल्याची घटना सोमवार २९ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एकावर रात्री १० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिलेल्या फिर्यादीनुसार, योगेश धर्मराज माळी वय-४३ रा. कौशल्य नगर, पाळधी ता. धरणगाव हे जळगाव शहरातील नवीन बसस्थानकात बस चालक म्हणून नोकरीला आहे. सोमवार २९ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास नवीन बसस्थानक डेपो मधील पेट्रोल पंपाजवळ ड्युटी राहण्याच्या कारणावरून शिवम संजय सूर्यवंशी रा. जळगाव याने बसचालक योगेश धर्मराज माळी यांना हातातील दगडाने मारहाण केली. त्यामुळे चालक योगेश माळी यांच्या डोक्याला हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यानंतर रात्री १० वाजता चालक योगेश माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुभम संजय सूर्यवंशी यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सलीम तडवी हे करीत आहे.

Protected Content