Home क्राईम विष प्राशन केल्या वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू !

विष प्राशन केल्या वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू !

0
150


धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील हनुमंत खेडा येथे राहणाऱ्या ६३ वर्षीय वृध्दाने विषारी औषध सेवन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत गुरूवारी १० जुलै रोजी दुपारी ३ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भिमराव मोतीराम अहिरे (वय ६३, रा. हनुमंतखेडा ता. धरणगाव) असे मयत झालेल्या वृध्दाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भिमराव अहिरे हे आपल्या कुटुंबियांसह धरणगाव तालुक्यातील हनुमंत खेडा येथे वास्तव्याला आहेत. १ जुलै रोजी दुपारी १ वाजता त्यांनी राहत्या घरी काहीतरी विषारी औषध घेतले. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली व त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. याबाबत गुरूवारी १० जुलै रोजी दुपारी ३ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ नितीन पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound