यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । माजी महसुल मंत्री व जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने विधान परिषदची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्याने यावल येथे जल्लोष करण्यात आला.
यावेळी पक्षाच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद व्यक्त करण्यात येवुन स्वागत करण्यात आला. एकनाथराव खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभेची उमेदवारी दिल्याने यावल तालुक्यातील पक्षाच्या वतीने शहरातील ‘भुसावळ टी’वर खडसे यांच्या विधान परिषद उमेदवारीचे कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले. यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजीने आनंद व्यक्त करण्यात आला.
यावल शहरातील खरेदी विक्री संघाच्या व्यापारी संकुलतातील पक्षाच्या संपर्क कार्यालया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले, पक्षाचे जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते, सामाजिक न्याय विभागाचे नाना बोदडे, ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष निवृत्ती धांडे, अरूण लोखंडे, कमलाकर घारू, मोहसीन खान, शहर उपाध्यक्ष आबिद मोमेन, डॉ.युवराज चौधरी, धिरज महाजन, हाजी फारूख, गणेश महाजन, एजाज पटेल, विजय साळी, आरीफ खान यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते.