पाचोरा प्रतिनिधी । पाचोर्यासारख्या शहरात डॉ. भूषण मगर आणि डॉ. सागर गरूड यांनी अतिशय धाडसाने मोठी गुंतवणूक करून विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलच्या माध्यमातून सुरू केलेली वैद्यकीय सेवा ही समाजासाठी आदर्श असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी केले. ते विघ्नहर्ताला दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी बोलत होते.
माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे हे एका कार्यक्रमानिमित्त पाचोरा येथे आले असतांना त्यांनी विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल येथे सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी हॉस्पीटलचे संचालक डॉ. भूषण मगर आणि डॉ. सागर गरूड यांनी नाथाभाऊंचे स्वागत केले. यानंतर आ. खडसे यांनी संपूर्ण हॉस्पीटलची पाहणी करून विविध विभागांबाबत माहिती जाणून घेतली. पाचोर्यासारख्या लहान शहरात अगदी जागतिक दर्जाची वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्याचे पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त करून कौतुकोदगार काढले. लहान गावात खूप मोठी गुंतवणूक केल्याबद्दल त्यांनी डॉ. भूषण मगर आणि डॉ. सागर गरूड यांचे तोंड भरून कौतुक केले. येथे अद्ययावत ऑपरेशन थिएटर असून बहुतांश शस्त्रक्रिया या अतिशय वाजवी दरात उपलब्ध असून येथे आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले जीवनदायी योजना उपलब्ध असल्याचे जाणून त्यांनी समाधान व्यक्त केले. यामुळे गोरगरीब नागरिकांना दुर्धर व्याधींवरील उपचार आणि अत्यंत महागड्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जात असल्याची माहिती त्यांनी जाणून घेतली. तर भविष्यात याच हिरीरीने ही आदर्श वैद्यकीय सेवा कायम रहावी यासाठी शुभेच्छा दिल्या.
पहा : विघ्नहर्ता हॉस्पीटलबाबत आ. एकनाथराव खडसे नेमके काय म्हणालेत ते !