मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नवी मुंबईत काल झालेल्या दुर्घटनेची जबाबदारी ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असून यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.
काल खारघर येथील कार्यक्रमानंतर श्री सदस्यांना उष्माघाताचा झालेला त्रास आणि यातून ११ जणांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण आता खूपच तापले आहे. हा पुरस्कार एखाद्या सभागृहात देणे शक्य असतांना देखील मोठ्या मैदानावर घेण्याचा अट्टहास कशासाठी ? हा प्रश्न आता विचारण्यात येत आहे. यामुळे राज्य सरकारला धारेवर धरण्यात येत आहे.
या प्रकरणी आता आम आदमी पक्षाच्या मुंबईतील नेत्या प्रिती शर्मा-मेमन यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा मागितला आहे. या संदर्भात त्या म्हणाल्या की, कालच्या कार्यक्रमाचे नियोजन हे राज्य सरकारने केले होते. यातील दुर्घटनेची जबाबदारी सरकारला पार पाडता आली नसल्यानेच ११ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. यामुळे एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.