एकनाथ शिंदे यांचा थेट शिवसेना पक्षप्रमुख पदावरच दावा !

नवी दिल्ली-वृत्तसंस्था | एकीकडे धनुष्यबाण चिन्हाच्या मालकीवरील लढाई अंतिम टप्प्यात आली असतांनाच मुख्यमंत्री शिंदे यांनी आता थेट पक्षप्रमुख पदावरच दावा केला आहे.

 

निवडणूक आयोगाने शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाला आपापले शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या वतीने ४० आमदार आणि १२ खासदारांसह लाखो प्राथमिक सदस्यांचा उल्लेख करत निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. या पत्रामध्ये शिवसेनेच्या पक्षअध्यक्ष पदावर शिंदे यांच्या वतीने दावा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पक्षाबरोबरच पक्षप्रमुखपदही शिंदे ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात दिसून येत आहे.

 

दरम्यान, यासोबत शिवसेनेने देखील आज आवश्यक असणारी कागदपत्रे केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर केली आहेत. यात खरा शिवसेना पक्ष हा आपलाच असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. आगामी काळात होणार्‍या पोटनिवडणुकीत पक्ष नेमका कोणता यावर निर्णय होणे अपेक्षित आहे. विधिमंडळात असलेल्या एकूण सदस्यांपैकी दोन तृतीयांश सदस्य आपल्या सोबत असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. त्यामुळे निवडणूक चिन्ह आपल्यालाच मिळावे, असा अर्ज शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे केला होता

Protected Content