एकनाथ शिंदे यांनी मान्य केला भाजपचा पाठिंबा

गुवाहाटी वृत्तसंस्था | बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नवीन गटातर्फे गटनेतेपदी निवड झाली. या प्रसंगी बोलताना त्यांनी आपल्याला एका  राष्ट्रीय पक्षाकडून सर्वतोपरी मदत होत असल्याचे स्पष्ट करताच त्यांना भारतीय जनता पक्षाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांची येथील हॉटेलमध्ये बैठक घेतली. यात शिवसेनेसह अपक्ष आमदारांची हजेरी असल्याचे या संदर्भात जारी करण्यात आलेल्या व्हिडिओ मधून दिसून आले. याप्रसंगी एकनाथ शिंदे हे उपस्थित आमदारांची संवाद करताना दिसून येत आहेत. त्यांनी तुम्हाला कोणत्याही बाबीची कमी पडणार नाही. आणि याची प्रचिती येत्या काळामध्ये मिळेल अशी ग्वाही दिली. याप्रसंगी सर्व आमदारांनी त्यांना एकमुखाने पाठिंबा दर्शवला. आणि अशाप्रकारे एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी अधिकृत निवड करण्यात आली दरम्यान याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी कोणतेही राजकीय भाष्य केले नाही मात्र आपल्याला एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.

एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे भारतीय जनता पक्षाचे नाव घेतले नसले तरी राष्ट्रीय पक्ष हा भारतीय जनता पक्ष असल्यामुळे आता त्यांना भारतीय जनता पक्षाची साथ असल्याचे स्पष्ट झाले आहे. उद्या राज्यपालांना ते भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणार असल्याचे पत्र देतील. हे देखील आता संकेत मिळाले आहेत यामुळे उद्याच ठाकरे सरकार गडगडणार असल्याचे मानले जात आहे. तर उद्या दुपारनंतर राज्यातील राजकीय घडामोडी प्रचंड वेगवान होतील असे आता मानले जात आहे.

Protected Content