Home Cities मुक्ताईनगर नाथाभाऊ म्हणतात…”मला काहीच माहित नाही !”

नाथाभाऊ म्हणतात…”मला काहीच माहित नाही !”

0
60

मुक्ताईनगर प्रतिनिधी । एकीकडे एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबद्दल जोरदार चर्चा सुरू असतांना त्यांनी मात्र आपल्याला याबाबत काहीही माहित नसल्याचे स्पष्ट केले आहे.

भाजपचे माजी मंत्री एकनाथराव खडसे हे पक्षावर नाराज असल्याचे कुणापासून लपून राहिलेले नाही. गेल्या अनेक दिवसांपासून ते आपले स्वत:च्या पक्षातील कट्टर विरोधी असणारे देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करत आहेत. यामुळे ते भाजपचा त्याग करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत महत्वाची बैठक झाली असून यात जळगाव जिल्ह्यातील पक्षाचे मोजके नेते उपस्थित असल्याने या चर्चेला पाठबळ मिळाले आहे. याबाबत मुंबई येथील बैठक आटोपल्यानंतर राष्ट्रवादीच्या जळगाव जिल्ह्यातील नेत्यांनी काहीही माहिती दिली नाही. तर या एकनाथराव खडसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्याला याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले. अर्थात, सध्या सुरू असणार्‍या हालचाली पाहता राजकारणात मोठ्या घडामोडी होणार असल्याचे दिसून येत आहे.


Protected Content

Play sound