पाचोरा प्रतिनिधी | लोकनेते एकनाथराव खडसे हे वादळ असून याला थोपवण्याची क्षमता कुणातही नाही. भाजपचा ओबीसी विरोधी अजेंडा आता समोर आला असून नाथाभाऊ हे वेळ आल्यावर याला उत्तर देणारच असल्याचे प्रतिपादन माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अनिल महाजन यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून केले आहे.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या जावयाला ईडीने अटक केली असून त्यांची देखील चौकशी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमिवर माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अनिल महाजन यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून एकनाथराव खडसे यांची जोरदार पाठराखण करत भारतीय जनता पक्षावर टीकास्त्र सोडले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांनी विधानसभेत ठराव पास करण्यासाठी प्रस्ताव मांडला नेमका याच वेळी आपल्या अकलेचे तारे तोडत समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी व फक्त राजकारण करण्यासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हरकतीचा मुद्दा मांडला कुठलाही अभ्यास नसतांना ओबीसी समाजाची माहिती नसतांना फक्त विनाकारण गोंधळ घालत ओबीसींच्या प्रश्न कसा रेंगाळत राहावा हेच आतापर्यंत खेळी भाजपाने केली आहे.
ओबीसीच्या समाजाच्या जीवावरच भाजप सत्तेत आला आणि उलट ओबीसी लाच त्रास देत आहे. विधान मंडळात घटना घडली. भाजपाची विचारसरणी ओबीसी विरोधात आहे. विधानभवनाच्या बाहेर येऊन यांचे लोक मीडियामध्ये सांगतात की, आम्ही ओबीसीच्या बाजूने होतो म्हणून आमचे १२ आमदार निलंबित केले. अरे कधीतरी सत्य बोला किती खोटं बोलता हे महाराष्ट्राच्या जनतेला कळत आहे. खरंच तुम्हाला ओबीसी बद्दल प्रेम असले असते तर आज केंद्रीय मंत्रिमंडळात जो विस्तार झाला त्यामध्ये का ओबीसी समाजाच्या खासदारांना मंत्री केले नाही. तिकडे तर तुम्ही इतर लोकांना मंत्री केलात का पंकजा मुंडे यांना राज्यसभा दिली नाही प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रीपद दिली नाही कारण खरे ओबीसी तुम्हाला चालत नाही हे उघड सत्य आहे.
या निवेदनात पुढे नमूद केले आहे की, भाजपचे बारा आमदार निलंबीत झाल्यानंतर लागलीच ईडीचे खडसे यांच्या जावयाला अटक केली. यामुळे केंद्रीय तपास यंत्रणा या भाजपाच्या इशार्यावर कसे काम करत आहे. सत्तेचा खरा दुरुपयोग महाराष्ट्राच्या भाजपच्या नेत्यांचा सांगण्यावरून केंद्राचे सत्ताधारी कसे करत आहेत. ही महाराष्ट्र ची जनता बघत आहे. एकनाथराव खडसे यांनाही ईडी ने लगेच समनस बजावला आहे. मात्र नाथाभाऊ हे तुफानी नेतृत्व आहे. कितीही वादळ आले तरी हे खडसे नावाचं वादळ कोणी हलवू शकणार नाही. एकनाथराव खडसे म्हणजे या महाराष्ट्राचा शोषीत पीडित वंचितांचा आवाज आहे योग्य वेळ आल्यावर विरोधकांना एकनाथ खडसे उत्तर देणारच ते कशा पद्धतीने देणार हे महाराष्ट्राच्या जनतेला चांगले माहित आहे. त्यामुळे आजपर्यंत जे जे एकनाथ खडसे यांच्या नादी लागले आहेत योग्य वेळी एकनाथ खडसे यांनी त्यांचा त्यांनी भुईसपाट केला आहे.
या निवेदनात शेवटी म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस जी अजुनही वेळ गेली नाही आता तर १२ आमदार निलंबित झाले आहेत तुम्ही अजून सावरले नाही तर पुढे अनेक असेच राजकीय गंभीर घटना होण्याची शक्यता आहे ? सन 2014 मध्येही काही कमी होतील कदाचित फक्त अर्धशतक तुमच्याकडे राहील त्यामुळे सौम्य पद्धतीने राजकारण करा आक्रमक पणा दूर ठेवा आणि एक आता जनतेला कळले आहे की भाजपा चा अजेंडा ओबीसी विरोधी आहे. असे अनिल महाजन यांनी या पत्रकात म्हटले आहे.