सामाजिक उपक्रमांनी आ. अनिल पाटील यांचा वाढदिवस साजरा

अमळनेर प्रतिनिधी | आमदार अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. माजी नगरसेवक राजू फाफोरेकर व कल्पनेश्वर प्रतिष्ठानतर्फे हरिओम नगरात आमदारांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.तर डॉ.कौस्तुभ वानखेडे व डॉ.श्रद्धा वानखेडे यांनी तपासणी केली. तसेच बस स्थानकावरील शिवभोजन केंद्रात आमदारांच्या हस्ते ५३ किलो लाडू वाटप करण्यात आले. बाजार समितीजवळील शिलनाथ शिवभोजन केंद्रात जिलेबी वाटप करण्यात आली.

बाजार समितीत प्रशासक मंडळ, कर्मचारी वृंद व व्यापारी बांधवांनी आमदारांचा सत्कार केला. मार्केट आवारात आमदारांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. रक्तदान शिबिरात आमदारांनी स्वतः रक्तदान केले. राष्ट्रवादी व्यापारी आघाडीचे शहराध्यक्ष दिनेश कोठारी व देविदास देसले यांनी गरीब होतकरु मुलास सायकल भेट दिली.

Protected Content