Home Cities मुक्ताईनगर एकनाथराव खडसे यांचा जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल

एकनाथराव खडसे यांचा जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल

0
52

जळगाव प्रतिनिधी | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीसाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज सूचकाच्या यांच्या माध्यमातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून आज जिल्हा बँकेच्या परिसरात गर्दी उसळली आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आल्यामुळे ते बॉंबे हॉस्पीटलमध्ये उपचार घेत आहेत. या अनुषंगाने आज त्यांनी मुक्ताईनगर विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून आपला अर्ज दाखल केला आहे.

आज निवडणूक निर्णय अधिकार्‍याकडे खडसे यांच्या वतीने वसंतराव भिकाजी पाटील यांनी यांच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज सादर करण्यात आला आहे. या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून वसंतराव भिकाजी पाटील यांची तर अनुमोदक म्हणून चंद्रकांत विनायक बढे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.


Protected Content

Play sound