गयाना वृत्तसंस्था । भारत आणि वेस्ट इंडिज संघादरम्यान खेळवल्या जाणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला आज दि. 9 ऑगस्ट रोजीपासून सुरुवात होणार होती. मात्र पावसाने तुफान बॅटिंग केल्यामुळे सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासंदर्भात माहिती अशी की, खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पावसाचा व्यत्यत्य आल्यामुळे सामना अनिर्णित घोषित करण्यात आला आहे. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करत १ बाद ५४ धावा केल्यानंतर मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे सामना रद्द करण्यात आला आहे. टी-२० मालिकेत वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर एकदिवसीय मालिकेतही भारत चांगली कामगिरी करतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पावसाने मुसळधार हजेरी लावल्यामुळे नाणेफेक पुढे ढकलण्यात आले आहे. पावसाने काही काळ विश्रांती घेतल्यानंतर भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण पाचच षटकांनंतर वरुणराजाचे पुनरागमन झालं. काही वेळासाठी खेळ थांबल्यांनंतर फक्त ४० षटकांचा सामना खेळवला जाईल असा निर्णय घेण्यात आला. पण तरीही पावसाच्या सरी कोसळत राहिल्यामुळे सामना ३४ षटकांचा करण्यात आला. १३ षटकांत वेस्ट इंडिजने १ बाद ५४ धावा केल्या. वेस्ट इंडिजचा सलामीचा फलंदाज ख्रिस गेल फक्त 4 धावा करून बाद झाला. त्यानंतर पुन्हा मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे सामना रद्द करण्यात आला.