Home धर्म-समाज खडकदेवळा येथे “ईद-ए-मिलाद” उत्साहात साजरा

खडकदेवळा येथे “ईद-ए-मिलाद” उत्साहात साजरा


पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । साईनाथ सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय खडकदेवळा बु” ता. पाचोरा यांच्या वतीने रविवारी ९ ऑक्टोबर रेाजी रोजी “ईद ए मिलाद” हा मुस्लिम बांधवांचा सण उत्साहात साजरा करण्यात आला.

तमाम मुस्लिम बांधवांना “ईद ए मिलाद” च्या गळाभेट घेऊन सामाजिक ऐक्य जोपासत “ईद ए मिलाद” या त्यांच्या पावित्र्य सणासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास फकिरा मामु, बाबू खाटीक, आशपक खाटीक, लतीफ पिंजारी, शेख आरिफ, शरीफ बाबा, अनिस खाटीक, शकील खाटीक सह सर्व मुस्लिम बांधवांना वाचनालयाचे सदस्य देवचंद गायकवाड, विश्वास पाटील, संजय पाटील, वाय. पी. निकम फाउंडेशनचे अध्यक्ष यशवंत पाटील तसेच गावातील उत्तम खर्डेकर, सुदाम नाना, दिलीप महात्मा, योगेश पाटील, वाल्मिक पाटील तसेच गावातील इतर नागरिकांनी शुभेच्छा दिल्या.


Protected Content

Play sound