ईद-ए-मिलाद” शहरात उत्साहात साजरी !

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | “ईद-ए-मिलाद” हा मुस्लिम बांधवांचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुस्लिम बांधवांतर्फे रविवारी ९ ऑक्टोबर रेाजी सकाळी ११ वाजता नेहरू पुतळा ते इदगाह मैदानपर्यंत जूलूश काढण्यात आला. या ठिकाणी तमाम मुस्लिम बांधवांना “ईद-ए-मिलाद” च्या गळाभेट घेऊन सामाजिक ऐक्य जोपासत “ईद-ए-मिलाद” या त्यांच्या पावित्र्य सणासाठी शुभेच्छा दिल्या.

 

इस्लाम धर्माचे सर्वश्रेष्ठ असे हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती म्हणून ईद-ए-मिलाद साजरी केली जाते.  मोहम्मद पैगंबर हे अल्लाहचे अंतिम प्रेषित होते. इस्लामच्या धारणेनुसार अल्लाहने त्यांच्यामार्फत कुराण हा धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवला. त्यामुळे त्यांना नबी रसूल आदी नावांनीही संबोधित केले जाते. इस्लाम मध्ये ईद-ए-मिलाद हा सर्वात मोठा दिवस असल्याचे मानला जाते. या अनुषंगाने जळगाव शहरात देखील ईद-ए-मिलाद निमित्त मुस्लिम बांधव मशिदीमध्ये यानिमित्ताने विशेष प्रार्थना करण्यात आली.  मोहम्मद पैगंबर यांच्या प्रतिकात्मक पावलांच्या निशाणावर प्रार्थना केली. तसेच मोहम्मद पैगंबर यांनी दिलेल्या शिकवणीचे स्मरण केले. यावेळी छत्रपती शिवाजी नगर, भिलपूरासह काही ठिकाणी भव्य मिरवणुका निघतात.  या सणाच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून गोरगरिबांना मदत करण्यात आली. शहरातील नेहरू पुतळा, शास्त्री टॉवर चौक, भिलपूरा चौक, सुभाष चौक, चित्रा चौक, नेरी नाका आणि इदगाह मैदान पर्यंत जूलूष काढण्यात आला. यावेळी मुस्लिम बांधवांच्या अनेक संघटनांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी मुस्लिम बांधवांनी  ईद-ए-मिलाद निमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

 

 

Protected Content