Home Cities यावल फैजपूर येथे रमजान ईद उत्साहात साजरी

फैजपूर येथे रमजान ईद उत्साहात साजरी

0
42

faizpur eid

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । येथील इदगाह मैदानावर ईदुल फित्र ची सामूहिक नमाज अदा करून ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

फैजपूर शहराच्या उत्तरेस असलेल्या ईदगाह मैदानावर सकाळी साडेआठ वाजता शहरातील मुस्लिम बांधवांनी ईदुल फित्र ची सामूहिक नमाज अदा करण्यात आली. यावेळी जामा मशीद चे पेश इमाम ताहेर पटेल यांनी खुदबा पठण करून पवित्र रमजान चे महत्व सांगितले. त्यात रमजानचे, तरावीह ची नमाज , जकात , सदका फित्र याचेही महत्व सांगितले. यानंतर सामूहिक दुआ करण्यात आली. याप्रसंगी शहरातील सर्व मशिदींचे मौलवी व शहरातील हजारो मुस्लिम बांधव उपस्थित होते.

दरम्यान ईदगाह मैदानावर नमाज अदा झाल्या नंतर फैजपूर पोलीस ठण्यातर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. माजी आमदार शिरीष चौधरी, भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी, उपनगराध्यक्ष रशीद तडवी, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ व्ही आर पाटील , ध. ना. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ जी पी पाटील, फैजपूर मंडळ अधिकारी भंगाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता शेख कुर्बान, नगरसेवक कलीम मण्यार, मसाका संचालक नरेंद्र नारखेडे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र होले, भाजपा शहर अध्यक्ष संजय रल, मलक आबीद सर,शेख रियाज, शेख जफर, रघुनाथ कुंभार यांच्यासह अनेकांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ईदगाह जवळ खान्देश नारी शक्ती ग्रुप व दिपाली ग्रुप फैजपूरतर्फे पाणी पिण्याची व्यवस्था करण्यात आली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound