मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत अवमानकारक पोस्ट शेअर केल्यामुळे गुन्हा दाखल झाल्यानंतर अभिनेत्री केतली चितळे हिला अटक करण्यात आली असून राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकार्यांनी तिच्यावर अंडी व शाईफेक केली आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, केतकी चितळे ही अभिनेत्री हिने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब यांच्यावरील अतिशय खालच्या स्तरावरच्या टिकेने प्रचंड खळबळ उडाली आहे. अभिनेत्री केतकी चितळे हीनं नितीन भावे यांची कविता शेअर केली असून यात अतिशय आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आला आहे. शरद पवार यांच्या विरोधात केलेल्या पोस्टनंतर तिच्यावर कळवा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर दुपारी ठाणे पोलिसांनी दुपारी केतली चितळे हिला ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर तिला सायंकाळी अटक करण्यात आली.
दरम्यान, अटक झाल्यानंतर केतकी चितळे हिला वैद्यकीय तपासणीसाठी नवी मुंबईतील रूग्णालयात घेऊन जात असतांना राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकार्यांनी तिच्यावर अंडीफेक करून तिच्यावर शाईफेक देखील केली. पोलीसांनी तातडीने पदाधिकार्यांनी दूर करून केतकी चितळेला रूग्णालयात घेऊन गेले आहेत.