जळगाव, प्रतिनिधी | ज्ञानोबारायांनी म्हटल्याप्रमाणे “इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी” या उक्तीप्रमाणे लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाज संघटीत करण्याचा प्रयत्न केला असे प्रतिपादन भागवताचार्य हभप दिपिकाताई महाराज देवळीकर यांनी केले.
पिंप्राळयाच्या राजाचा मान असलेल्या स्नेहल प्रतिष्ठानचे श्री गणेश प्रतिष्ठापनेचे यंदा १८ वे वर्ष आहे. यंदा सलग ८ दिवस सामाजिक प्रबोधनावर आधारित कीर्तनमाला रात्री ८ वाजता आयोजित करण्यात आली आहे. बुधवारी कीर्तनमालेतील द्वितीय पुष्प हभप दिपिकाताई महाराज यांनी गुंफले. त्यांनी लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला गणेशोत्सव जगभरात साजरा होतो आहे असे यावेळी हभप दिपिकाताई महाराज देवळीकर यांनी सांगितले. चांगले सत्कर्म करा, लोकांशी प्रेमाने रहा तुम्हाला सर्व आयुष्यात चांगले फळ मिळेल असेही हभप दिपिकाताई महाराज यांनी सांगितले. यावेळी माजी प्राचार्य डॉ.संभाजी देसाई यांनी प्रमुख उपस्थिती दिली होती. सूत्रसंचालन हरीश वाघ, आभार अमोल अहिर यांनी केले.