भालोद येथील कुलसूमबी उर्दू शाळेच्या चौकशीला शिक्षणाधिकाऱ्यांची दिरंगाई

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील भालोद येथील कुलसूमबी उर्दू शाळेच्या हस्तांतरणाबाबतच्या प्राथमिक चौकशी संदर्भात नाशिक विभागाने वारंवार पत्रव्यवहार करूनही संस्थाचालक आणि लोकप्रतिनिधी पत्रांची दखल न घेणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला आठ दिवसात चौकशी अहवाल सादर न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात यईल असा इशारा नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक यांनी दिला होता. त्यानुसार नुकतीच शाळेची चौकशी करण्यात आली आहे.

सविस्तर माहिती अशी की, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला नाशिक विभागाचे उपसंचालक यांनी यावल तालुक्यातील भालोद येथी कुलसूमबी उर्दू शाळेच्या हस्तांतरणाच्या प्राथमिक चौकशी करावी व तसा अहवाल सादर करावा अश्या सुचना देण्यात आल्या होत्या. मात्र जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांनी चौकशी वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या पत्रांबाबत गांभीर्याने दखल घेत नसल्याचे नाशिक विभागाच्या निदर्शनास आले होते. त्यानुसार १५ एप्रिल रोजी नाशिक विभागाने जळगाव शिक्षणाधिकाऱ्यांना अंतिम स्मरणपत्र पाठविले त्यावेळी आठ दिवसांच्या आता कार्यालयात अहवाल सादर करावा असे सांगण्यात आले होते. परंतू शिक्षणाधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने दखल न  घेता तब्बल अडीच महिन्यांनी म्हणजे २९ जून २०२१ रोजी हज्जन कुलसुमबी उर्दू शाळेची चौकशी करण्यात आली.

याप्रसंगी अल अमीन संस्थेच्या संस्थापक सदस्यांनी शाळा हस्तांतरणासंदर्भात माहिती अधिकार नुसार न्यास नोंदणी कार्यालय विभागिय उपसंचालक कार्यालय नाशिक व माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद जळगांव कार्यालयाकडून मिळालेली उत्तरे चौकशी अधिकाऱ्यांकडे सादर केलेली आहेत. आठ दिवसात उपसंचालकांना अहवाल सादर करणार असल्याचे उपशिक्षणाधिकारी देवांग यांनी तक्रारदारांना सांगितले. 

Protected Content