मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | माजी मंत्री तथा शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांना ईडीने दणका देत दहा कोटींपेक्षा जास्त रकमेची मालमत्ता जप्त केली आहे.
सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने अनिल परब यांना मोठा धक्का दिला आहे. आज ईडीने एका ट्विटच्या माध्यमातून या कारवाईची माहिती दिली आहे. यानुसार, अनिल परबांशी संबंधित संपत्ती ईडीनं जप्त केली आहे. १० कोटी २० लाखांची ही संपत्ती असून अनिल परब, साई रिसॉर्ट आणि इतरांशी संबंधित असलेल्या मनी लॉड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती ईडीनं ट्विट करून ही माहिती दिलीय.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्या विरोधात मोर्चा उघडला असून ईडीसह पोलिसांकडे तक्रार केली आहे. याची दखल घेऊनच परब यांची आधी चौकशी करण्यात आली होती. यानंतर आता ईडीने त्यांची दहा कोटी २० ला खरूपयांची मालमत्ता जप्त केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.