परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरी ईडीचे छापे

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधीत ठिकाणांवर आज सकाळपासूनच सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीच्या पथकाने छापे टाकले आहेत.

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधीत ठिकाणी आज सकाळपासूनच ईडीने छापे टाकले आहेत. एकूण सात ठिकाणी ही कारवाई सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित वसुली प्रकरणात परब यांच्या सहभागाचा आरोप असून यातूनच त्यांना आधी ईडीने दोनदा नोटीस दिली होती. यात त्यांची चौकशी देखील झाली होती. यानंतर आज हे छापे टाकण्यात आले आहेत.

किरीट सोमय्या यांनी केंद्रात अनिल परब यांच्याविरोधात तक्रार केली होती. सचिन वाझे आणि १०० कोटींच्या प्रकरणातही अनिल परब यांचं नाव समोर आलं होत. परबांचे पार्टनर संजय कदम यांच्या घरातूनही मोठं घबाड हाती लागलं होतं. यानंतर आज ईडीची छापेमारी सुरू झाली असून यात परब यांच्या दापोली रिसॉर्टचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. अनिल परब यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरीट सोमय्या यांनी परबांवर परिवहन खात्यात पैशांची अफरातफर केल्याचा आरोप केला होता. परिवहन खात्यातीत अधिकारी बजरंग खरमाटे ही व्यक्ती परबांचा वाझे असल्याचा आरोपही झाला होता. तसेच अनिल परब यांच्यावर सुमारे ५० कंत्राटदारांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा संशय यंत्रणांना आहे. त्यातून या कारवाईला सुरुवात झाल्याचे मानले जात आहे.

Protected Content