मुंबई, वृत्तसंस्था । माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने सुद्धा गुन्हा दाखल केला आहे. त्यांचावर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीच्या आरोप केला होता.
अनिल देशमुख यांची प्राथमिक चौकशी केल्यानंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दिल्लीत दाखल करण्यात आला असून देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहे. आता ईडीकडून अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच अनिल देशमुख यांची ईडीमार्फत चौकशी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, १०० कोटी वसुली आरोपांची प्राथमिक तपास करत सीबीआयने अनिल देशमुख यांच्याविरोधात दिल्लीत गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी अनिल देशमुख यांनी मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठाकडे याचिका दाखल केली आहे. न्यायधीश एस.एस. शिंदे आणि मनिष पितळे यांच्या खंडपीठापुढे याच आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.