जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात इको-फ्रेन्डली होळी साजरी करण्यात आली, होळीचे पुजन IQAC समन्वयक डॉ. चेतन सरोदे यांनी केले त्या नंतर होळी पेटविण्यात आली, विद्यार्थ्यांनी रंगाची उधळण करत नृत्य केले व होळीचा आनंद लुटला.
होळीसाठी महाविद्यालयातील परिसरातील कचरा, पालापाचोळा व वाळलेल्या झाडाच्या फांद्या गोळा करून परिसर स्वच्छ करून हा स्वच्छतेच्या या मुलमंत्राचा समाजासमोर एक नवीन आदर्श ठेवला. महाविद्यालयात साजऱ्या करण्यात आलेल्या होळी सणाच्या प्रसंगी पर्यावरणाला व निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी पोहचणार नाही याची खबरदारी घेतली गेली. महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.