खा. शि. मंडळाच्या निवडणुकीत ‘त्या’ पराभवांचीच चर्चा !

अमळनेर-गजानन पाटील | खान्देश शिक्षण मंडळाच्या निवडणुकीत सत्ताधार्‍यांना सत्ता कायम राखण्यात यश आले असले तरी या निवडणुकीतील दोन पराभव चांगलेच गाजल्याचे दिसून आले. पहा याबाबतचा विशेष वृत्तांत.

खान्देश शिक्षण मंडळाची बहुप्रतिक्षित निवडणूक पार पडल्यानंतर याच्या मतमोजणीसाठी देखील मोठा विलंब लागला. अखेरीस रविवारी याची मतमोजणी पार पडून आशीर्वाद पॅनलला सत्ता मिळाल्याचे निकालातून दिसून आले आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यमान संचालकांना मतदारांची चांगलीच नाराजी भोवली. त्यात विद्यमान माजी आमदार डॉ बी. एस. पाटील व विद्यमान संचालक जितेंद्र जैन यांना पराभवाचा धक्का बसला तर दोन नव्या संचालकांना संधी मिळाली असून डॉ. अनिल शिंदे व उद्योगपती विनोद पाटील यांची एन्ट्री झाली आहे.

पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेल्या प्रदीप अग्रवाल व हरी भिका वाणी संदेश गुजराती यांनी आघाडी घेतली. तर आधीच्या फेरीत आघाडीवर असलेल्या नीरज अग्रवाल, जितेंद्र जैन, योगेश मुंडदे यांनी शेवटच्या फेरीत पिछाडी घेतली होती. यात मतदारांनी पिछाडीचा धक्का दिला. यावर आता भविष्यात चुका न करण्याचा इशारा दिला आहे.

निसटता पराभव – अखेरच्या फेरीत जितेंद्र जैन व योगेश मुंडदे यांच्यात चुरस होती. त्यात ९ मतांचा फरक होऊन अखेर जितेंद्र जैन यांचा पराभव होऊन योगेश मुंडदे यांनी एन्ट्री घेतली. व विजय प्राप्त केला. कल्याण पाटील व विनोद पाटील चोथ्या आणि पाचव्या क्रमांकावर राहिले तर सहाव्या क्रमाकांवर नीरज अग्रवाल आणि सातव्या क्रमांकावर डॉ अनिल शिंदे यांनी आघाडी घेतली. आठव्या क्रमांकावर योगेश मुंडदे हे ९ मतांनी विजयी झाले. एकूण ८ संचालक विजयी झाले असून तर माजी आमदार डॉ बी. एस. पाटील हे दहाव्या क्रमांकावर राहिले.

या निवडणुकीत जितेंद्र जैन, भरत कोठारी, प्रभाकर कोठावदे, प्रवीण जैन, हेमंत पवार, प्रसाद शर्मा, न्या. गुलाबराव पाटील, कमल कोचर आदी जण पराभूत झाले. मात्र माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांना बसलेल्या फटक्याची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. याच्या जोडीला जितेंद्र जैन यांना पराभव देखील अनपेक्षित मानला जात आहे.

 

Protected Content