खा. रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नांमुळे मुक्ताईनगर कोविड सेंटरमध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध

 

मुक्ताईनगर प्रतिनिधी । कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी खासदार रक्षाताई खडसे यांनी जळगाव जिल्ह्यात केंद्रीय समितीचे पथक पाठवण्याची मागणी आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांच्याकडे केली होती. त्या मागणीनुसार केंद्रीय आरोग्य समितीचे सदस्यांनी जळगाव जिल्ह्यात दौरा करून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला असून रक्षाताईंच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. या मागणीला यश मिळून पंतप्रधान सहायता निधीमधून मुक्ताईनगर येथे व्हेंटिलेटर मिळाले असल्याने आरोग्य यंत्रणेला बळकटी मिळाली आहे.

कोरोनाच्या गंभीर रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. कारण गंभीर रुग्ण अधिक आणि व्हेंटिलेटर अगदी कमी, अशी अवस्था निर्माण होत आहे. यासाठीच खासदार रक्षाताई खडसे यांनी रावेर लोकसभा क्षेत्रातील कोरोनाच्या गंभीर रुग्णासाठी तातडीने व्हेंटिलेटर उपलब्ध व्हावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे मागणी केली होती. रुग्णांमध्ये कोरोनासोबतच इतरही गंभीर स्वरूपाच्या आजारांची लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांची प्रकृती गंभीर असते. परिणामी, त्यांना व्हेंटिलेटरची आवश्यकता भासते. त्यानुसार डॉक्टरही रुग्णाला व्हेंटिलेटर लावण्याचा सल्ला देतात; परंतु सद्य:स्थितीत गंभीर रुग्णांची संख्या वाढत असल्याने उपलब्ध व्हेंटिलेटर अपुरे पडत आहेत. ऐनवेळी आवश्यक सुविधा न मिळाल्याने रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. या व्हेंटिलेटरमुळे कोरोनाच्या गंभीर रूग्णांना दिलासा मिळून त्यांचा जीव वाचवता येईल अशी आशा खासदार रक्षाताई खडसे यांनी व्यक्त केली आहे.

रक्षाताईंच्या हस्ते उद्घाटन
मुक्ताईनगर येथील कोविड सेंटर येथे व्हेंटिलेटर नसल्याने रुग्णांवर उपचारासाठी अडचणी येत होत्या. तसेच अनेक गंभीर रुग्ण व्हेंटिलेटर नसल्यामुळे जळगाव येथे पाठवावे लागत होते. मुक्ताईनगर पासून जळगाव 60 किलोमीटर वर आहे, त्यामुळे गंभीर रुग्णांना हलवणे सुद्धा जिकिरीचे होते. मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय येथे व्हेंटिलेटरचे लोकार्पण खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी जिप सभापती जयपाल बोदडे, नगराध्यक्ष नजमाताई तडवी, भाजप तालुकाध्यक्ष रामभाऊ पाटील, प्रभारी पंस सभापती विद्याताई पाटील, सरचिटणीस सुनील काटे, तालुका उपाध्यक्ष निलेश मालवेकर, उपनगराध्यक्ष मनीषाताई पाटील, जिप सदस्य वैशाली ताई तायडे, जिप सदस्य निलेश पाटील, तालुका उपाध्यक्ष मोहन महाजन, भाजयुमो विधानसभा क्षेत्रप्रमुख दत्ताभाऊ पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी,भाजयुमो सरचिटणीस मुन्ना बोंडे, भैय्या पाटील, उपाध्यक्ष जयेश कारले, शुभम काळे, बापू ससाणे, प्रदीप साळुंखे, प्रवीण पाटील, प्रसिद्धीप्रमुख शिवराज पाटील व मान्यवर उपस्थित होते.

Protected Content