पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के

bhukanp

पालघर वृत्तसंस्था । गेल्या दीड वर्षांपासून पालघर जिल्ह्यात भूकंपाच्या धक्क्यांचं सुरू असलेले चित्र अद्यापही कायम आहे. आज सकाळी पुन्हा एकदा पालघर जिल्ह्याला भूकंपाचे धक्के बसले आहे. पालघरमधील डहाणू, कासा, तलासरीतील परिसर भूकंपाचे धक्क्याने हादरले. जिल्ह्यात सौम्य स्वरूपाचे भूकंपाचे धक्के बसले असले तरी नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

पालघर जिल्ह्यातील डहाणू, कासा, तलासरी तालुक्यात भूकंपाचे सातत्याने धक्के बसत असतात. शुक्रवारी (25 ऑक्टोबर) दिवसा आणि रात्री पालघरमध्ये जवळपास 5 सौम्य स्वरुपाचे धक्के जाणवले. तर शनिवारी (26 ऑक्टोबर) पहाटेच्या सुमारात 2 धक्के बसल्याची नोंद गुजरात सिसमोलोस्टिक रिसर्च सेंटरने केली आहे. शनिवारी पहाटे 4 वाजून 6 मिनिटांनी कासा, चारोटी, पेठ, शिसने, आंबोली परिसरात भूकंपाचा धक्का बसला. हा धक्का सौम्य स्वरुपाचा असला तरी नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान शुक्रवारी 2.6, 2.0, 2.0, 2.4, 1.8, 1.9 रिस्टर स्केल क्षमतेचे 5 धक्के पालघरमध्ये बसल्याची नोंद करण्यात आली आहे. दीड वर्षांपासून पालघरमध्ये सतत भूकंपाचे धक्के का जाणवत आहे, याची कारण शोधण्यात शासकीय यंत्रणा अपयशी ठरली आहे. भूकंपाने तडे गेलेली घरे, अंगणवाड्यांच्या दुरुस्तीचे प्रस्तावही पालघर जिल्हा परिषदेकडे धूळ खात पडले आहेत. त्यामुळेही लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

Protected Content