मुंबई, वृत्तसंस्था । राज्य सरकारने नियमावली जाहीर करताना ई-पासची अट रद्द केली आहे. यामळे आंतरराज्य प्रवास करण्यावरील बंधनं शिथील झाली आहेत. यामुळे प्रवास करताना आता ई-पासची गरज नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे. याशिवाय खासगी तसंच मिनी बसेसना परवानगी देण्यात आली आहे
‘अनलॉक ३’ चा टप्पा ३० ऑगस्ट रोजी संपला असून केंद्र सरकारकडून १ सप्टेंबपासून अनलॉक ४ टप्पा सुरु होईल अशी घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान केंद्र सरकारकडून घोषणा झाल्यानतंर राज्य सरकारच्या नियमावलीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यानुसार राज्य सरकारने निमयावली जाहीर केली असून ३० सप्टेंबरपर्यंत निर्बंध कायम राहणार असल्याचं सांगितलं आहे.
हॉटेल आणि लॉज यांनाही पूर्णपणे सुरु होण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारने शाळा, कॉलेज तसंच शैक्षणिक संस्था ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचं सांगितलं आहे. याशिवाय चित्रपटगृह, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, बार, सभागृह यांच्यावरही बंधनं कायम आहेत.