दिल्लीमध्ये धुळीच्या वादळामुळे दोन जणांचा मृत्यू; विविध अपघातात २३ जखमी

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देशाची राजधानी दिल्ली येथील एनसीआर परिसरात तीव्र उष्णतेदरम्यान १० मे रोजी रात्री हलका पाऊस झाला. हा पाऊस धुळीच्या वादळासह झाला होता. या वादळामुळे अनेक इमारतीचे नुकसान झाले असून झाड पडल्याने दोन जणांचा मृत्यूही झाला आहे.
वादळामुळे विविध अपघात घडले आणि त्या अपघातात २३ जण जखमी झाले आहे. पोलिसांनी सांगितले की त्यांना झाडे पडण्याशी संबंधित १५२, इमारतींच्या नुकसानाशी संबंधित ५५ आणि वीज तोडण्यासंबंधी २०२ कॉल आले आहेत.

Protected Content