जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील ३६ लसीकरण केंद्रावर आज दिवसभरात ४ हजरी ७२४ जणांना पहिली लस तर ६२२ जणांना दुसरी लस देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकुण ९७ हजार ८०९ जणांना कोवीशिल्डची पहिली लस देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग हजारहून अधिक रूग्ण कोरोना बधित आढळून येत आहे. आज बुधवारी २४ मार्च रोजी तब्बल 1 हजार २२३ बाधित रूग्ण जिल्ह्यातून आढळून आले आहे. कोरोना लसीकरणासाठी जिल्ह्यातील 36 ठिकाणी लस उपलब्ध करून देण्यात आले आहे. आज बुधवार २३ मार्च रोजी दिवसभरात झालेले लसीकरण याप्रमाणे आहेत. जिल्हा शासकीय रूग्णालय-167, छत्रपती शाहु महाराज हॉस्पीटल- 134, जामनेर-38, चोपडा-31, मुक्ताईनगर-31, चाळीसगाव-96, पारोळा- 163, रावेर-3, यावल-12, भडगाव-23, एरंडोल-४, भुसावळ रेल्वे हॉस्पिटल-280, एमडी भुसावळ-31, खडका रोड-27, धरणगाव-5, पाल-16, पिंपळगाव-33, पहूर-24, नाव्ही-41, सावदा-103, वरणगाव-139 आणि रोटरी क्लब जळगाव 137, पीएचसी सेंटर-2 हजार 988 असे एकुण 4 हजार 724 जणांना कोरोनाची पहिली लस देण्यात आली आहे. तर कोरोनाची दुसरी लस जिल्ह्यात आज 622 जणांना देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.