अमळनेर प्रतिनिधी । येथे एलसीबीच्या पथकाने स्थानिक पोलिसांसह केलेल्या कारवाईत नकली दारू तसेच दुध तयार करणार्या रॅकेटचा पर्दाफाश करून त्यातील आरोपींना गजाआड केले आहे.
याबाबत वृत्त असे की, अमळनेर येथील ढेकू रोड परिसरातील जय योगेश्वर नकली दारू व नकली दूध तयार केले जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला मिळाली होती. या अनुषंगाने आज धडक कारवाई करण्यात आली. यात नकली दारू व दुध तयार करण्याची यंत्रसामग्री, दारूच्या बॉटल्स व दुधाचे कॅन्स तसेच दोन दुचाकी असा ऐवज जप्त करण्यात आला. यात विजय अमृत पाटील व शिवाजी मन्साराम पाटील यांच्यासह एक महिला या संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या संदर्भात अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई एलसीबीचे निरिक्षक बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि अंबादास मोरे व त्यांच्या सहकार्यांनी केली.