तळेगाव शिवारातून डंपरची चोरी

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तळेगाव शिवारातून हॉटेल समोरून चारचाकी हायवा डंपर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, राजू काशिनाथ निकम (वय-५६) रा. नाचनवेल ता. कन्नड जि. औरंगाबाद हे डंपर चालक असून त्यांच्या मालकीचा डंपर (एमएच १२ एफझेड ७१०६) हा चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव शिवारातील रस्त्यावर असलेल्या नक्षत्र हॉटेल समोर रविवारी ३ जुलै रोजी सकाळी पार्क केलेला होता. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ५० लाख रूपये किंमतीचा डंपर चोरून नेल्याचे उघडकीला आली. राजू निकम यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षा जाधव करीत आहे.

 

Protected Content