विधायक कामांना सहकार्य; पण हवा तिथे विरोध राहणारच : अजित पवार

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात नुकत्याच सत्तारूढ झालेल्या विधायक कामांना आपले सहकार्य राहणार असले तरी जिथे जनहिताला बाधा येईल तिथे प्रखर विरोध राहणार असल्याचा इशारा अजित पवार यांनी दिला. विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर ते बोलत होते.

राज्य विधीमंडळाचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन आज पार पडले. यात अधिवेशन संपण्याआधी विरोधी पक्षनेतेपदी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची निवड जाहीर करण्यात आली. निवड झाल्यानंतर विविध नेत्यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. पवार यांच्या रूपाने एक सक्षम विरोधी पक्षनेता मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, याला उत्तर देतांना अजित पवार यांनी प्रारंभी सर्वांचे आभार मानले. ते पुढे म्हणाले की, माझ्या कार्यकाळात एकही कायदा चर्चेशिवाय मंजूर होणार नाही, असा विश्वास मी राज्यातील जनतेला देतो. यासाठी मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना सहकार्य करण्याचं आवाहन करतो. यापूर्वी अनेक विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहात जनतेचे मुद्दे उपस्थित केले. तशीच चर्चा घडवण्याचं काम आपण करू असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या दुबार पेरणीचं संकट आलं आहे. धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी अपेक्षा जनतेची असते. सत्ताधार्‍यांकडून न्याय मिळाला नाही तर ते विरोधी पक्षाकडे जातात. आपण कायम न्याय मिळवून देण्यासाठी काम करू. सरकारच्या कामांना योग्य त्या ठिकाणी आपले सहकार्य तर जनहिताला बाधा आल्यास प्रखर विरोध असेल असे त्यांनी नमूद केले.

 

Protected Content