भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या डंपर भडगाव पोलीसांनी कारवाई केली असून ४ ब्रास वाळूसह डंपर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात डंपर मालक व चालक या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भडगाव शहरातून बेकायदेशीरपणे वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती भडगाव पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी ११ मार्च रोजी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास डंपर क्रमांक (एमएच २० ईजी ८८५८) या डंपरवर कारवाई केली. त्या डंपरमध्ये ४ ब्रास वाळू मिळून आली. याबाबत विचारणा केली असता चालकाने उडवाउडवीचे उत्तरे दिली. पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे यांनी वाळूने भरलेले डंपर जप्त केले आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात डंपर मालक अशोक नामदेव गायकवाड रा.सारोळा ता. पाचोरा आणि आदेश चौधरी रा. बाहेरपूरा पाचोरा या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडूरंग पवार हे करीत आहे.