किचकट प्रक्रियेमुळे आमदारांना मार्गदर्शन गरजेचे असल्यानेच हॉटेलमध्ये – राऊत

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | आमदार फुटू नयेत यासाठी प्रत्येक पक्ष काळजी घेत आहे. राज्यसभा विधानपरिषद मतदान प्रक्रिया किचकट असून आमदारांना मार्गदर्शन गरजेचे आहे. त्यामुळे शिवसेनेने आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले असल्याचे खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे.

राज्यसभेसाठी मतदानापूर्वी सर्वच पक्ष आमदार फुटू नयेत याची काळजी घेत आहेत. महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनचे प्रत्येकी एक आणि भाजपा दोन असे पाच जागा सहज विजय मिळवता येईल, परंतु सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपकडून रस्सीखेच सुरु आहे. मतदानादरम्यान दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेनेचे आमदार हॉटेल मध्ये ठेवण्यात आले आहेत. यावरून आमदारांवर विश्वास नसल्याचा प्रश्न भाजपाने उपस्थित केला.

यावर संजय राऊत यांनी फक्त आम्हीच नाहीत तर काँग्रेस भाजपाने देखील त्यांच्या आमदारांना हॉटेलवर ठेवले आहे. तुमचे विचारांचे आदान प्रदान होत असेल तर मग शिवसेनेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील, याची खात्री असल्याचेही खा. राऊत यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीकडे २६ मते अतिरिक्त आहेत, १६ मतांची गरज आहे. तर भाजपकडे स्वताची २२ आणि अन्य ७ आमदार अशी २९ मते आहेत त्यांना १३ मते आवश्यक आहेत. आणि यासाठीच लहान घटक अपक्ष आमदारांचे पाठबळ मिळवण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडी कडून विविध प्रयत्न केले जात आहेत.
———

Protected Content