ना. जावळे यांच्या पाठपुराव्यामुळे यावल-रावेर मतदारसंघात एक कोटीची कामे मंजूर

na. haribhau javale

रावेर, प्रतिनिधी | ना. हरिभाऊ जावळे यांच्या प्रयत्नातून रावेर विधानसभा मतदार संघातील नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी भारतरत्न डॉं. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत एक कोटी इतका निधी मंजूर झाला आहे.

 

मंजूर कामे पुढील प्रमाणे :- पाडळसे वार्ड क्र ५ मध्ये गटार बांधकाम करणे ८ लक्ष, भालोद इंदिरा नगर मध्ये ट्रीमिक्स कॉंक्रिटीकरण करणे १५ लक्ष, डोंगर कठोरा अनुसूचित जाती जमाती वस्ती मध्ये ट्रीमिक्स कॉंक्रिटीकरण व गटार बांधकाम करणे ५ लक्ष, न्हावी येथे अनुसूचित जाती जमाती वस्ती मध्ये ट्रीमिक्स कॉंक्रिटीकरण करणे ५ लक्ष, सांगावी बु अनुसूचित जाती जमाती वस्ती मध्येसामाजिक सभागृह बांधकाम करणे १० लक्ष, बामणोद अनुसूचित जाती जमाती वस्ती लगत मोठ्या गटारीचे बांधकाम करणे १० लक्ष, चिनावल येथे अनुसूचित जाती-जमाती वस्तीमध्ये ट्रीमिक्स कॉंक्रिटीकरण करणे १० लक्ष, मुंजलवाडी येथे अनुसूचित जाती-जमाती वस्तीमध्ये ट्रीमिक्स कॉंक्रिटीकरण करणे ७ लक्ष, कुंभारखेडा येथे अनुसूचित जाती-जमाती वस्तीमध्ये ट्रीमिक्स कॉंक्रिटीकरण करणे ५ लक्ष, खिरोदा प्र.यावल येथे अनुसूचित जाती-जमाती वस्तीमध्ये ट्रीमिक्स कॉंक्रिटीकरण करणे ५ लक्ष, निंभोरा येथे अनुसूचित जाती-जमाती वस्तीमध्ये ट्रीमिक्स कॉंक्रिटीकरण करणे १० लक्ष, थेरोळा येथे अनुसूचित जाती-जमाती वस्तीमध्ये ट्रीमिक्स कॉंक्रिटीकरण करणे ५ लक्ष, निंभोरा सीम येथे अनुसूचित जाती-जमाती वस्तीमध्ये ट्रीमिक्स कॉंक्रिटीकरण करणे ५ लक्ष, या माध्यमातून रावेर यावल मतदार संघात अनुसूचित जाती-जमाती वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत. त्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Protected Content