मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात १९ महसूल मंडळामध्ये एक महिन्यापासून पावसाचा खंड पडल्यामुळे खरीप पिक विमा नियमानुसार पिक विम्याच्या लाभाच्या रकमेपैकी २५ टक्के रक्कम अग्रीम स्वरूपात देण्याची मागणी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांनी केली आहे.
जळगाव जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने पाठ फिरवल्यामुळे खरीप कापूस, तुर, उडीद, मुंग, मका, ज्वारी, बाजरी या पिकांची गंभीर परिस्थिती झालेली असून जिल्ह्यात ८६ पैकी १९ मंडळांमध्ये सलग २१ दिवसांपासून पाऊस झालेला नाही त्यामुळे पिकावर मोठा दुष्परिणाम झालेला असून ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत खरीप पिकांचा विमा काढलेला आहे. अशा शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या २६ जूनच्या शासन निर्णयानुसार हंगामातील प्रतिकूल हवामान परिस्थिती उद्भवल्याने म्हणजे एका महसूल मंडळामध्ये सलग २१ दिवस पावसाचा खंड पडल्याने किंवा २.५ मीमी पेक्षा कमी पाऊस पडल्याने संबंधित महसूल मंडळातील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई देय आहे. त्यामुळे अशा विम्याच्या लाभार्थी शेतकऱ्यांना पिक विमा कालावधी संपुष्टात येण्याच्या आधी विम्याच्या लाभाच्या रकमेपैकी २५ टक्के रक्कम अग्रमी स्वरूपात देणे बंधनकारक आहे म्हणून अशा खरीप हंगामातील सतत एक महिना पावसाचा खंड पडल्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना पिक विम्याच्या रकमेपैकी २५ टक्के रक्कम अग्रमी स्वरूपात देण्याची मागणी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत केली .