बिलावरून झालेल्या वादातून ग्राहकांनी बारमालकाच्या डोक्यात ३० बाटल्या फोडल्या

चंद्रपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बिलावरून वाद झाल्यानंतर याचे पर्यावसान तुफान हाणामारीत झाले. बारमध्ये आलेल्या ग्राहकांनी बारमालकाच्या डोक्यात ३० बाटल्या फोडून त्याला गंभीररित्या जखमी केले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून ओका आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील वरूर रोड येथील एका बारमध्ये घडली. वेंकटेश मंथापुरवार असे जखमी बारमालकाचे नाव आहे. राजुरा तालुक्यातील वरुर रोड येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या हॉटेल सितारा बार अँड रेस्टॉरंट येथे रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास काही लोकांनी बार मालकावर प्राणघातक हल्ला केला. मालकाची प्रकृती चिंताजनक असल्याची समजते.

रविवारी रात्री दारू पिण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीने बिलावरून वाद घालायला सुरूवात केली. बारमधील कर्मचाऱ्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र नशेत असलेल्या या ग्राहकाने बारमध्ये तोडफोड करत बार चालक नारायण मंथापुरवार व त्यांचा मुलगा वेंकटेश मंथापुरवार यांना मारहाण केली. यावेळी मुलगा व्यंकटेश याच्या डोक्यावर त्याने ३० हून अधिक दारूच्या बाटल्या फोडल्याने त्यांच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला चंद्रपूर येथील मेहरा हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. मालक गंभीर जखमी असून बिअर बारची तोडफोडीने बारचे मोठे नुकसान झाले आहे.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून बिलावरून झालेल्या वादानंतर ३ आरोपींनी बारमालकाच्या डोक्यावर बिअर व दारूच्या तब्बल ३० बाटल्या फोडल्या. हल्लेखोरांपैकी रोहित तोकलवार या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तर त्याच्यासोबत असलेले राजेश आणि भीमराव हे दोन सख्खे आरोपी भाऊ घटनेनंतर फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Protected Content