नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारत यंदा आपला ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. त्यामुळे येत्या 15 ऑगस्टला देशभरात देशभक्ती, अभिमान आणि उत्साहाला भरते येणार आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था आणि नैतिक जबाबदारी म्हणून महाराष्ट्र आणि देशभरात ‘ड्राय डे’ पाळला जाणार आहे. सहाजिकच देशातील कोणत्याही शहरात, गावात, दुकानात मद्यविक्री केली जाणार नाही.
स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जावा म्हणूनच या दिवशी ‘ड्राय डे’ पाळला जातो. संपूर्ण देशभरात कोठेही मद्यविक्री केली जात नाही. लोकांवर नशेचा अंमल होऊ नये यासाठी देशभरात कोणत्याही ठिकाणी मद्यविक्री सुरु ठेवली जात नाही. संपूर्ण देशातील नागरिक आजही 15 ऑगस्ट 1947 या दिवसाची आठवण मोठ्या अभिमानाने ठेवतात. हा दिवस पाहण्यासाठी देशभरातील नागरिकांनी केलेल्या कष्टांची, समर्पनाची कायम आठवण ठेवतात.