कर्नाटकातील राजकीय घडामोडी निर्णायक वळणावर

नवी दिल्ली वृत्तसंस्था । कर्नाटक सरकारमधील पाच आमदार भाजपच्या संपर्कात असून या राज्यात सत्तांतर घडणार का? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

कर्नाटक सरकारवरील संकटचा सावट अजून गडद झाल्याचे आता दिसून येत आहे. गत काही दिवसांपासून जेडीएस व काँग्रेसमधील काही आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे वृत्त आले होते. यामुळे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी सतर्क झाल्याचेही निदर्शनास आले होते. दरम्यान, आता भाजपने कुमारस्वामी यांच्यावर आपल्या पक्षाच्या आमदारांना आमीष दाखविण्याचा आरोप केला आहे. भाजपने आपले सर्व म्हणजे १०४ आमदारांना दिल्लीनजीक गुरूग्राममधील एका हॉटेलमध्ये ठेवून सावध पवित्रा घेतला आहे. मात्र, पाच काँग्रेस आमदार आपल्या पक्ष नेतृत्वाच्या संपर्कात नसल्याची बाब आज सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. हे आमदार जर भाजपला जाऊन मिळाले तर कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस आघाडीचे सरकार कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे आता कर्नाटकातील राजकीय घडामोडी निर्णायक वळणावर आल्याचे दिसून येत आहे.

Add Comment

Protected Content