दारूच्या नशेत महिलेच्या घरात घसून विनयभंग

फैजपूर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यात एका गावात राहणाऱ्या एका २४ वर्षीय महिलेचा हात पकडून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवार ११ जुलै रोजी फैजपूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील एका गावात २४ वर्षीय महिलाही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ११ जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजता गावात राहणारा जितेंद्र उर्फ येडा बाळू तायडे हा दारूच्या नशेत येऊन महिलेच्या घरात घुसला. यावेळी महिला एकटीच घरात असल्याने त्याने महिलेचा हात पकडून अश्लील चाळे करत तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत त्याचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर विवाहितेने फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार त्याने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी जितेंद्र उर्फ येडा बाळू तायडे यांच्या विरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेश बऱ्हाटे करीत आहे.

Protected Content