दारूच्या नशेत नाश्ता विक्रेत्याला लोखंडी हातोडीने मारहाण

नशिराबाद पोलीसात एकावर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नाश्त्याचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन दारुच्या नशेत असलेल्या एकाने नाश्ता विक्रेत्याच्या डोक्यात लोखंडी हातोडी मारून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवारी २७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील भवानी नगरात राजेंद्र दगडू कोळी वय-४५ रा. भवानी नगर, नशिराबाद, ता.जि.जळगाव हे वास्तव्यास आहे. त्यांची महामार्गाच्या सर्विसरोडलगत नाश्त्याची गाडी आहे. बुधवारी २७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास गावातील हरि चौधरी (पुर्ण नाव गाव माहित नाही) हा दारुच्या नशेत राजेंद्र कोळी यांच्या दुकानावर नाश्ता करण्यासाठी आला. याठिकाणी भजी खाल्ल्यानंतर कोळी यांनी त्याच्याकडे पैशांची मागणी केली. त्याचा राग आल्याने त्याने त्याच्या हातातील हातोडी राजेंद्र कोळी यांच्या डोक्यात मारली. यामध्ये ते गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांनी नशिराबाद पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ युनूस शेख हे करीत आहे.

Protected Content